murghas

: मुरघास चारा पद्धत :

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

             मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किन्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहीत अवस्थेमध्ये जगणारया सूक्ष्म सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरानीत असलेल्या साखरेपासून लॅक्टिकआम्ल तयार होतो. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडाय ऑक्साइड तयार होतो. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते. व खड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो.

: मुरघासाचे फायदे :

 • मुरघास हा जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे.
 • मुरघासाला वाळलेल्या चारया पेक्षा कमी जागा लागते म्हणजे एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मुरघासाच्या स्वरूपात ५०० कि. हिरवा चारा ठेवता येतो. दररोज हिरवा चारा जनावरांना कापून घालण्यापेक्षा त्याचा मुरघास बनविल्यास चारा पिकाखाली जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पिक त्वरित घेता येते. म्हणजेच आपणाला जास्त पिके घेता येतात. व रोज चारा कापून खाऊ घालण्यामागील वेळ व कष्ट वाचतात.
 • मुरघास बंधिस्त जागेत असल्याने त्यास आगीचा धोका नाही. तसेच तो जास्त दिवस टिकून ठेवता येतो. व हिरवा चारा नसेल अशा टंचाईच्या काळात मुरघास वापरता येतो. उपयुक्त व पौष्टिक चारा व गावात यांचा वापर मूरघासात केल्याने प्रथिने व कॅरोटीन चे प्रमाण मुरघासात जास्त असते.
 • मुरघासात तयार होणारे लॅक्टिकआम्ल हे गायी – म्हीशींचे पचणेन्द्रीयात तयार होणारया रसासारखे असते म्हणून मुरघास पचण्यास सोपे असते.
 • मुरघासामुळे जनावराची भूक वाढते. व ते मुरघास जास्त खातात. वाया घालवीत नाहीत. कारण तो रुचकर, स्वादिष्ट व सोम्य रेचक असते.
 • वाळलेल्या चारयाच्या पौष्टेकते करीता मुरघासाची पौष्टिकता उत्तम असते.
 • मुरघासाकरीता चारा पिकाची कापणी फुलोरा अवस्थेत केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नद्रवे चारयामध्ये येतात.
 • हिरव्या चारयापासून मुरघास तयार करून हा मुरघास टंचाईच्या काळामध्ये पाहिजे तेव्हा वापरता येतो. पावसाच्या पाण्यावर चाऱ्यासाठी अवलंबून असणाऱ्या प्रदेशमध्ये पावसाळ्यामध्ये तयार झालेल्या हिरव्या चाऱ्यांचा मुरघास करून तो उन्हाळ्यामध्ये वापरता येतो.
 • मुरघास तयार केल्यास मजुरावर होणारा खर्च कमी होतो. मजुरांचे व्यवस्थापन व्यवस्थित  करणे श्याक्य होते.

: मुरघासासाठी कोणकोणती पिके घ्यावीत :

उत्तम प्रकारचा मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, संकरीत नेपिअर, (हत्तीघास), मार्वेल (पन्हाळी गावात), उसाचे वाडे, ओट, इ. एकदल वर्गीय चारा पिकांचा उपयोग करता येतो. कारण या पिकांमध्ये अंबवीण्याच्या क्रियेसाठी लागणारया साखरेचे प्रमाण जास्त असते. तसेच या पिकाची साल जाड व टणक असते. त्यामुळे हि पिके वळविण्यासाठी जास्त वेळ घेतात. म्हणून हि पिके वाळवीन्यापेक्षा मुरघास बनविण्यासाठी जास्त सोयीस्कर आहेत.

: मुरघासाचे नियोजन कसे कराल :

दुध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी खड्यात किंवा टाकीमध्ये मुरघास करता येतो. दुध उत्पादकांमध्ये किती जनावरे आहेत, मुरघास किती दिवसांकरिता करावयाचा आहे. प्रत्येक जनावरास किती मुरघास देणार, तेवढा हिरवा चारा उपलब्ध आहे का..? याचे पूर्व नियोजन मुरघास करण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.

उदा. एका शेतकऱ्याकडे ४ दुभती जनावरे आहेत. व उन्हाळ्याच्या चार महिन्यात हिरवा चारा उपलब्ध नाही. अशा वेळेस दुध उत्पादकाला खालील नियोजन करता येईल:

 • दुध देणारी एकूण चार जनावरे आहेत.
 • चार महिने म्हणजे १२० दिवसांसाठी मुरघास तयार करावयाचा आहे.
 • प्रत्येक गाईस दिवसाला २० किलो मुरघास या प्रमाणे ४ जनावरांसाठी ८० किलो. मुरघास  रोज द्यावा लागेल.
 • १२० दिवसांकरिता रोज ८० किलो. प्रमाणे एकूण ९६०० किलो. हिरवा चारा असने आवश्यक आहे.
 • एक घन फुट खड्यामध्ये (१ फुट लांब, १ फुट रुंद व १ फुट उंच म्हणजेच १ घन फुट)
 • १६ किलो हिरव्याचारयाची कुट्टी मावते. त्यावरून तयार कराव्या लागणारया खड्याचे माप काढता येते. एकूण आवश्यक ९६०० किलो. हिरवा चारयास १६ ने भागल्यास ६०० घनफूट खड्डा घ्यावा लागेल. ( २० फुट लांब, 6 फुट रुंद व ५ फुट उंच )

: मुरघासाची खड्डा पद्धत :

 • मुरघासाच्या खड्याची रचना, आकार व बांधण्याची पद्धत हि त्या ठिकाणाची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी व जनावरांची संख्या यावर अवलंबून असते.
 • खड्डा बनविताना तो जास्तीत जास्त उंच जागेवर करावा. म्हणजे पावसाचे पाणी त्यात झिरपणार नाही.
 • चौरस खड्डा असल्यास कोपऱ्याच्या जागेत हवा राहण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी  खड्ड्याचे कोपरे गोलाकार असावेत.
 • खड्ड्याच्या भिंती हवाबंद आहेत कि नाही याची खात्री करावी. भिंतीना छिद्रे किवा भेगा नसाव्यात यासाठी भिंतींना सीमेंटने गुळगुळीत प्लेस्टर करावे.
 • खड्याची खोली हि त्या भागातील जमिनीतील पाण्याच्या पातळीवर अवलंबून असते. जेथे पाण्याची पतळी वर आहे. तेथे जमिनीवर टाकी बांधावी व जेथे पाण्याची पातळी खोल आहे तेथे जमिनीत खड्डा घेऊन तो बांधून काढणे सोयीचे व फायद्याचे आहे.,
 • खड्डा खोडून बांधकाम प्लास्टर करण्यास जास्त खर्च होत असल्यास, खडा खोदल्या नंतर निळ्या रंगाचा २०० मायक्रोन चा प्लास्टिक पेपर वापरावा.

: मुरघासावरील प्रक्रिया :

 • पौष्टिक व संतुलित मुरघास बनविण्यासाठी त्यावर योग्य प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
 • प्रती टन कुट्टी केलेल्या हिरव्या चारयावर प्रक्रिया करण्यासाठी १ किलो युरिया, २ किलो गुळ, १ किलो मीठ, १ किलो मिनरल मिक्चर व १ लिटर ताक वापरावे.
 • युरिया, गुळ, मिनरल मिक्चर व मीठ वेगवेगळ्या भांड्यात घेऊन १० ते १५ लिटर पाण्यामध्ये विरघळून घ्यावे व नंतर कुट्टी केलेल्या चारयाच्या थरावर शिंपडावे.

: मुरघास खड्डा भरण्याची पद्धत :

 • चारयाचे पिक फुलोऱ्यात आणल्यावर, चिकात असताना किंवा दाणे भरण्यास सुरवात झाल्या बरोबर पिकाची कापणी करावी. व चारा ५ ते 6 तास सुकू द्यावा. म्हणजे त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८० टक्क्यावरून ६५ – ७० टक्क्यापर्यंत कमी होईल.

 

: मुरघास खड्डा भरण्याची पद्धत पुढील प्रमाणे छायाचित्र साहित :

: मुरघासाचा वापर :

            ८ ते १० आठवड्यानंतर खड्यामध्ये असणाऱ्या चारयात आम्बविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल अशा वेळी खड्डा एका बाजूने उघडावा व तो वापरण्यास सुरवात करावा. वापरात नसताना खड्डा बंद ठेवा. मुरघासाची चव निर्माण करण्यासाठी जनावरांना पहिले  ५ – ६ दिवस ५ – ६ किलो मुरघास हिरव्या चाऱ्याच्या कुट्टीत मिसळून घालावा. एकदा आंबट गोड चवीची सवय लागली कि जनावरे मुरघास आवडीने खातात. वाया घालावीत नाहीत.

: मुरघासाची प्रत :

 • बुरशी  :    मुरघास व्यवस्थित दाबला नाही तर त्यात बुरशीची वाढ होते.
 • वास   :    चांगल्या मुरघासाला आंबट-गोड वास येतो.
 • रंग    :    चांगल्या मुरघासाचा रंग फिकट हिरवा किंवा तपकिरी असतो. कुजलेल्या मुरघाचा

                   रंग काळा असतो.

 • सामू   :   चांगल्या मुरघासाला सामू ( पी.एच. ) ३.५ ते ४.२ या योग्यतेचा असतो.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

विनंती : आम्ही दिलेली माहिती आपणास कशी वाटली त्याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.

 

 

कृपया विश्वास ठेवून फक्त हे एकदा वाचा ... Click Here.

 

To the top